Saturday, February 17, 2007

आकाशाचे रंग




पहाटवेळी आकाशात विरळ ढग जमावेत आणि तशात सूर्योदय व्हावा. मन भरून टाकणारं आकाश आम्ही सकाळी टिपलं. निळं, केशरी, किंचित करडं एक ना अनेक रंग दिसले.

Thursday, February 15, 2007

सूर्योदय


सुंदर पहाटवेळी सूर्य उगवताना पाहिला की त्याची रेशमी किरणं दिवस मजेत जाणार याची ग्वाही देतात. अशाच एका रम्य सकाळी सूर्याची किरणं आम्ही कॅमेर्‍यात टिपली.

Monday, February 12, 2007

फुलपाखरं












लंडन जवळ आईल ऑफ वेईट नावाचं एक छोटसं बेट आहे. त्या बेटावर अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. त्यातीलच एक फुलपाखरांच म्युझियम आहे. देश विदेशातली फुलपाखरं तिथे सुखेनैव राहतात. फुलपाखरांच्या जन्मापासूनच्या सर्व अवस्था तेथे पहायला मिळतात.

तेथेच एक कारंजांचं प्रदर्शन ही आहे. लहान मुलांसाठी एक छान पिकनिक स्पॉट आहे ही जागा.