Tuesday, March 6, 2007

सदाफुली!!! खर्‍या अर्थानं सदाफुली. सदैव फुललेली!! वर्षभर बहरलेली!! आकर्षक रंग आणि कायम फुललेलं झाड बघताना छान वाटतं.

yummieeeee या फुलांचे गुच्छ तोडून त्यातला मध चाखायला मजा यायची. खुप फुलातला मध आम्ही लहानपणी चाखलाय.

कुंडीच्या कठड्याच्या आधाराला धरून आलेलं हे गुलाबाचं फुल. काटे असतानाही कसं आनंदात कसं फुलावं हे याच्याकडून शिकावं.



संध्याकाळी रोज न चुकता मी या फुलाकडे एकदा तरी बघते. जेमतेम दिड इंच लांबीचं फुल. पण फ्रेश रंग आणि त्याची टवटवी माझ्या मनाला एक आनंद देऊन जाते.

पिवळा चाफा. लहानपणी आम्ही याच्या पाकळ्यांना छिद्र पाडून अंगठी करायचो. दोन बोटांमध्ये धरून ठेवायचं आणि कोणाची अंगठी जास्त वेळ ताजी राहते यासाठी एकमेकींशी पैज लावायचो.