Thursday, March 22, 2007



एका सुट्टीच्या दिवशी लंडनला फिरायला गेलेलो. दिवसभर फिरलो. खुप स्पॉट्स पाहिले. संध्याकाळ होत आली तशी आकाशात विमानाच्या धुराची नक्षी तयार होत होती. मावळलेल्या सूर्याचा प्रकाश विमानाच्या धुराच्या रेषेवरून परावर्तीत होत होता. करड्या रंगाच्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर धुरांच्या रेषांची नक्षी उठून दिसत होती. समोर येणार्‍या इमारतींच्या काळ्या रंगाची सावलीमुळं फोटोला उठाव आला.
वरील फोटोत जे दिसतय ते थेम्स नदीकाठी असलेल्या ईमारतींची रांग. याच रांगेत पार्लमेंट, बंकिगहम पॅलेस आहे. या इमारतीही संध्याकाळी छान दिसतात. दिव्यांची केलेली रोषणाई, आणि संधीप्रकाश.... खुप छान दिसतं.

Tuesday, March 6, 2007

सदाफुली!!! खर्‍या अर्थानं सदाफुली. सदैव फुललेली!! वर्षभर बहरलेली!! आकर्षक रंग आणि कायम फुललेलं झाड बघताना छान वाटतं.

yummieeeee या फुलांचे गुच्छ तोडून त्यातला मध चाखायला मजा यायची. खुप फुलातला मध आम्ही लहानपणी चाखलाय.

कुंडीच्या कठड्याच्या आधाराला धरून आलेलं हे गुलाबाचं फुल. काटे असतानाही कसं आनंदात कसं फुलावं हे याच्याकडून शिकावं.



संध्याकाळी रोज न चुकता मी या फुलाकडे एकदा तरी बघते. जेमतेम दिड इंच लांबीचं फुल. पण फ्रेश रंग आणि त्याची टवटवी माझ्या मनाला एक आनंद देऊन जाते.

पिवळा चाफा. लहानपणी आम्ही याच्या पाकळ्यांना छिद्र पाडून अंगठी करायचो. दोन बोटांमध्ये धरून ठेवायचं आणि कोणाची अंगठी जास्त वेळ ताजी राहते यासाठी एकमेकींशी पैज लावायचो.